
दत्ता देशमुख
छत्रपती संभाजीनगरचा जालना रोड हा शहराच्या मध्यवर्ती भागातून जातो. अनेक दशकांपासून हा रस्ता अपघातांचे कारण ठरत आला. जालन्यासह मराठवाडा, विदर्भाला जाण्यासाठी हाच रस्ता असल्याने तसेच औद्योगिक वसाहतींकडे जाणारा आहे.
वाळूजकडे जाणारा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा ठरला होता. शहराकडे येणारे सारे छोटे मोठे रस्ते गर्दीने ओसंडून वाहतात. शहर रोजगाराचे, व्यवसायाचे, शिक्षणाचे, वैद्यकीय सेवेसाठी गरजेचे आहे. परिणामी दुचाकी व खासगी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे.