India AI Summit 2026
Esakal
पुणे - जगातील इतर देशांसाठी भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारतात काय घडतंय याची खडानखडा माहिती इतर देश ठेवत असतात. भारतात सध्या AI Impact Summit, India 2026 पार पडतंय. या समिटचा आजचा शेवटचा दिवस. या समिटच्या माध्यमातून भारत कसा इतर देशांच्या बरोबरीने काम करतो आहे, भारताकडे कसं कुशल मनुष्यबळ आहे आणि जागतिक स्तरावर भारत हा कसा तंत्रस्नेही देश आहे हे भारताला या समिटच्या माध्यमातून दाखवून द्यायचं होतं.. पण खरोखरच या चार दिवसांत हा प्रयत्न साध्य झाला का?
हे समिट पहिल्यांदाच दिल्लीत भरविण्यात आलं आहे. पण ते भरविण्यामागचा हेतू काय होता, याचं आयोजन कोणी केलं होतं, या समिटमध्ये कोणत्या संस्थांची निवड करण्यात आली होती, या चार दिवसांत भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर काहीशी खराब झाली असं काय घडलं यामध्ये, या समिटमध्ये कोणत्या जायंट कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते आणि या एआय समिटमधून काय साध्य होईल असं तज्ज्ञांना वाटतं हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ च्या या लेखातून.