

AI Global Impact Summit
esakal
- अनिरुद्ध सुरी, इंडिया इंटरनेट फंडचे व्यवस्थापकीय संचालक
नवी दिल्लीत ‘एआय ग्लोबल इम्पॅक्ट’ परिषद नुकतीच पार पडली. भारताचे ‘एआय भवितव्य’ हे ‘एआय महासत्ता’ बनण्याबद्दल नाही, तर सर्वाधिक मानवकेंद्रित ‘एआय’ कल्पनाविश्व निर्माण करण्यात आहे. भारताच्या ‘आत्मनिर्भर’ या संकल्पनेला नव्याने विकसित व्हावे लागेल.
अमेरिका आणि चीनसारखे देश कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शर्यतीत गुंतलेले असताना, जगातील इतर देशांपुढे एक नवा पेच निर्माण झाला आहे. परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा स्तंभ असलेला धोरणात्मक स्वायत्ततेचा पाठपुरावा भारतासारख्या देशासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, याच धोरणात्मक स्वायत्ततेचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मूलभूतपणे नव्याने विचार करण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने स्वायत्तता ही तंत्रज्ञान सुरक्षित व्यवस्था किंवा राष्ट्रवादातून येणार नाही. धोरणात्मक परस्परावलंबी करण्याच्या सूक्ष्म दृष्टिकोनातून या स्वायत्ततेचा प्रवास होईल.