
India Russian oil imports
esakal
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारताच्या तेल खरेदीला ‘रक्तरंजित पैसे’ (ब्लड मनी) म्हटले आहे. अलीकडेच त्यांनी युरोपियन देशांनाही भारताने रशियाकडून तेलाची आयात थांबवावी यासाठी १०० टक्के आयात शुल्क आकारण्याच्या आवाहनवजा सूचना केल्या आहेत. या सर्व गदारोळामुळे रशियातून भारत तेलखरेदीबाबत इतका आग्रही का आहे? भारत रशियाकडून केली जाणारी तेलाची आयात थांबवत का नाहीये? हा प्रश्न विचारला जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतामध्ये अमेरिकन वस्तूंवर आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्काबाबत त्यांच्या मागील कार्यकाळापासून सातत्याने आक्षेप घेत आले आहेत. जानेवारी २०२५ मध्ये दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात केल्यानंतर त्यांनी आयात शुल्काचा मुद्दा आपल्या परराष्ट्र धोरणाच्या आणि आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानीच आणला.