
India foreign policy
esakal
डॉ. अरविंद येलेरी
तियानजिन येथील शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत भारताची दहशतवादाविषयीची भूमिका मान्य करण्यात आली. त्याचप्रमाणे व्यापार उदारीकरणालाही पाठिंबा देण्यात आला. पंतप्रधान मोदींचा शांघाय सहकार्य शिखर परिषदेतील सहभाग ऐतिहासिक ठरला.
गे ल्या काही महिन्यांचा काळ भारताच्या परराष्ट्र धोरणनिर्मितीसाठी तणावाचा ठरला आहे. भारताच्या वाढत्या राजनैतिक क्षमतेच्या प्रतिमेवर अमेरिकेकडूनच हल्ला झाला. भारत-चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक गहिरे होत गेले आणि रशिया-युक्रेन संघर्षाने जागतिक पार्श्वभूमीवर अधिक उग्र रूप धारण केले आहे.