
India Crude Oil Import Economy
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या संभाषणात भारताने अमेरिकेकडून अधिक तेल विकत घ्यावे, असा आग्रह ट्रम्प यांनी धरला. भारताने रशियाकडून तेलआयात कमी करावी, असा दबाव येण्याचीही शक्यता आहे. याचा परिणाम भारतातील पेट्रोल- डिझेलच्या किमतींवर होऊ शकतो. रशिया- युक्रेन युद्ध, आखातातील तणाव यामुळेही जगातील ऊर्जासंकट गडद होत आहे.