

Modi Trump silence strategy
esakal
सुनील चावके
अमेरिकेशी व्यापार वाटाघाटी आणि अन्य मुद्द्यांवर जो काही संवाद साधायचा असेल तो अधिकृत आणि मुत्सद्देगिरीच्या शालीन माध्यमातूनच साधायचा, असा सावध पवित्रा भारताने घेतला आहे. या सावधनीतीच्या केंद्रस्थानी आहे ते पंतप्रधान मोदी आणि भारताचे ‘मौन’.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शाब्दिक हल्ल्यांना सामोरे जाताना अध्यात्म-दर्शनात मौलिक मानली जाणारी मौनाची महत्ता समजून घेत आहेत. लक्ष्य साध्य करण्यासाठी ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ हेच सर्वात प्रभावी माध्यम असल्याची प्रचिती ‘ऑपरेशन सिंदूर’ला अचानक विराम लागल्यापासून त्यांना येत आहे.