Premium| U.S. secondary sanctions: स्वस्त रशियन तेलाचा फायदा घ्यायचा की, अमेरिकेचा रोष टाळायला रशियन तेलाचा व्यापार कमी करायचा? अशा द्वंद्वात भारताची भविष्याची धोरणे काय असतील?

India Russian oil Imports: दुय्यम निर्बंधांच्या भीतीमुळे भारतीय तेलकंपन्या सावध झाल्या आहेत. जागतिक बाजारात डॉलरचे वर्चस्व आणि अमेरिकेचा दबाव लक्षात घेता, भारताची आत्मनिर्भर ऊर्जा रणनीती अधिक वेगाने पुढे न्यायची गरज आहे
India Russian oil Imports

India Russian oil Imports

esakal

Updated on

अमेरिकेने २२ ऑक्टोबर २०२५ रोजी रशियाच्या दोन मोठ्या तेल कंपन्या, रॉसनेफ्ट आणि लुकोईल यांच्यावर निर्बंध लादले आहेत. भारत सध्या दररोज १.६ दशलक्ष बॅरल्स रशियन तेल आयात करतो, ज्यामध्ये सुमारे ६०% तेल रशियाच्या या दोन प्रमुख कंपन्यांकडून येते. अशा परिस्थितीत भारताने ही आयात कमी केली नाही तर भारताला अमेरिकेच्या कडक निर्बधांनाचा करावा लागू शकतो.

भारताच्या बाजारात सुमारे ८०० अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक आहे, ज्यात मोठा भाग डॉलरमध्ये आहे. जर अमेरिका नाराज झाली तर भारताकडे आणि एकूणच साऱ्या जगाकडे डॉलरचा सामना करण्याचे सामर्थ्य नाही. दुसरीकडे रशिया बरोबरचा तेलाचा व्यापार कमी करावा तर आज पर्यंत रशिया इतकं स्वस्त तेल भारताला कधीच कोणीच दिलं नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत भारत कोणते धोरणात्मक निर्णय घेणार हा महत्त्वाचा विषय आहे.

या पार्श्वभूमिवर अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताला ऊर्जा पुरवठ्यात किती बदल करावे लागतील? डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचे उपाय किती यशस्वी ठरतील? रशियाच्या तेलावर अवलंबित्व टिकवताना भारताने आपले राजनैतिक संतुलन कसे राखावे? जागतिक ऊर्जा बाजारातील बदल भारतासाठी फायदेशीर असतील की आव्हानात्मक? नवीकरणीय ऊर्जा आणि डिजिटल रुपयाद्वारे भारताची रणनीती कितपत आत्मनिर्भर ठरेल? अशा अनेक प्रश्नाची सखोल उत्तरे आपण या सकाळ प्लसच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com