

US China relations
esakal
अमेरिका व चीनने व्यापारयुद्धात केलेल्या तात्पुरत्या युद्धविरामामुळे निर्माण होणाऱ्या नव्या आर्थिक आणि भू-राजकीय आव्हानांना सामोरे जाताना भारताची कसोटी लागणार आहे. जगाला आपल्याकडेच बघावे लागेल, असे आपण काय करू शकतो, याचा भारताला यानिमित्ताने नव्याने विचार करावा लागणार आहे.
दक्षिण कोरियाच्या बुसानमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात वर्षभरासाठी तात्पुरता व्यापारातील ‘युद्धविराम’ झाला. पहिल्या दोन आर्थिक महाशक्तींमध्ये झालेल्या हातमिळवणीमध्ये तिसरी आर्थिक महाशक्ती म्हणून वाटचाल करीत असलेल्या भारताची कोणतीही भूमिका नव्हती. या दोन्ही देशांच्या एकत्र येण्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक आणि भू-राजकीय आव्हानांना सामोरे जाताना येणाऱ्या काळात भारताची कसोटी लागणार आहे.