

Why Internal Party Democracy Is Missing in India: A Deep Dive
E sakal
Dynastic Politics and the Crisis of Intra-Party Democracy in India
डॉ. अविनाश कोल्हे
भारतीय वंशाचे झोहरान ममदानी यांची न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी निवड झाली, या घटनेतील पक्षांतर्गत निवडणुकीच्या पैलूचा संदर्भ महत्त्वाचा आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अमेरिकेतील पक्षपद्धत, तेथे कशा प्रकारे पक्षातर्फे उमेदवारी दिली जाते, अशा गोष्टी समजून घेतल्या तर भारतीय लोकशाहीच्या दृष्टीनेही ते पथ्यकर ठरेल. यातील महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेत कोणत्याही राजकीय पदासाठी जर निवडणूक लढवायची असेल तर आधी पक्षांतर्गत निवडणूक लढवावी लागते. पक्षांतर्गत निवडणूक जिंकली की मगच पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू होते. न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अँड्रू क्युमो आणि ब्रँड लंँडर हेही इच्छुक होते. पक्षांतर्गत निवडणुकीत ममदानी यांनी दोघांचा पराभव केला. त्यानंतर त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली.
आपल्या देशातील जवळपास एकाही पक्षात ‘पक्षांंतर्गत लोकशाही’ हा प्रकार आढळत नाही. आपल्याकडे ‘हायकमांड’ हे फार महत्त्वाचे सत्ताकेंद्र आहे.