
Algorithmic Warfare in India
esakal
अजेय लेले
‘अल्गोरिदमिक वॉरफेअर’ ही संकल्पना आता रूढ होऊ लागली आहे. ती कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलनाच्या साहाय्याने आधुनिक युद्धांचे स्वरूप बदलत आहे. युद्धाचा वेग, अचूकता आणि निर्णयक्षमता वाढवत आहे, ज्याचा संरक्षणासाठी लाभ होईल. त्यामुळे भारताने या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करायला हवी.
नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या ‘राष्ट्रीय संरक्षण नवोन्मेष परिषदे’पूर्वी आयोजित ‘रक्षा नवाचार संवाद’ या परिषदेदरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले की, अलीकडील काळात युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. भविष्यकाळातील युद्धे ही स्वायत्त शस्त्रास्त्रप्रणाली, ड्रोन, क्वांटम कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ऊर्जाशस्त्रे यांसारख्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून लढली जातील. त्यामुळे या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या उद्योजकांनी आणि ‘स्टार्टअप्स’नी अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाची निर्मिती करून, भारताला संरक्षणसामग्रीनिर्मिती क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. ते म्हणाले की, युद्धभूमीचे स्वरूप बदलले आहे.