Premium|IPO Market India : आयपीओंचा बाजारात धडाका; प्रत्येक संधी फायदेशीर असेलच असे नाही

IPO Market and Stock Market Investment : जागतिक आर्थिक अनिश्चितता, कच्च्या तेलाचे वाढते दर आणि बाजारातील चढ-उतार यांदरम्यान आयपीओंची वाढती संख्या गुंतवणूकदारांसाठी संधी आणि जोखीम दोन्ही निर्माण करत आहे.
IPO Market India

IPO Market India

esakal

Updated on: 

भूषण महाजन - kreatwealth@gmail.com

सध्याच्या आव्हानात्मक जागतिक परिस्थितीत जागतिक आणि देशांतर्गत शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार दिसत आहेत. अशा परिस्थितीतही ‘आयपीओं’ची मात्र, जोरदार चलती असल्याचे दिसून येत आहे. अनेक छोट्या कंपन्यांनी ‘आयपीओ’ आणून मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी केली आहे. नुकत्याच आलेल्या बहुचर्चित ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’च्या ‘आयपीओ’ने शेअर बाजारात धमाकेदार पदार्पण केले.

मात्र, ‘आयपीओं’चा असा भडिमार होत असताना, ‘आयपीओं’ची संख्या वाढणे आणि गुंतवणुकीच्या चांगल्या संधी वाढणे या दोन वेगवेगळ्या

गोष्टी आहेत, हे गुंतवणूकदारांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

अनेक गुंतवणूकदार आम्हाला विचारतात, ‘‘तुम्ही म्हणता शेअर बाजारात तेजी येणार आहे; पण कच्चे तेल नवनवे उच्चांक करत आहे, अमेरिकेसोबत अजूनही करार झालेला नाही, महागाई अस्मानाला भिडली आहे, फक्त भारतात नाही तर जगात सर्वत्र! इराण युद्ध संपलेले नाही, देशांतर्गत चाललेली आंदोलने; हे सारे तुम्ही बघत नाही का?’’ आमचे एकच उत्तर! या साऱ्या निरुत्साही करणाऱ्या बातम्या आहेत म्हणूनच ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ आजच्या पातळीवर आहेत. सर्व आव्हानांची उकल झाल्यास हे भाव राहतील का? आणि त्यातही हळूहळू बदल होताना दिसत आहे. रशियाला डिझेल विकायला सवलत दिली म्हणजेच भारतावरची १०० टक्के ‘टेरिफ’ची टांगती तलवार काही काळ दूर झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नाने रुपयाला स्थैर्य आले आहे. कच्चे तेल ११० डॉलरवर पोहोचले म्हणजे पुढे १२० डॉलरपर्यंतही जाऊ शकते. तसे झाल्यास पर्यायी इंधनाचा शोध वाढेल, हे उत्पादकांनाही कळते. म्हणूनच भाव खाली येऊ शकतात. एकच मोठी जोखीम आहे, ‘मार्जिन ट्रेडिंग’मधील कर्ज दीड लाख कोटी रुपयांवर गेले आहे. आता थोडे भविष्याकडे पाहात आज गुंतवणूक सुरू करायला हवी. रात्र सरली आहे आणि झुंजुमुंजू झाले आहे, आता तयारीत राहिले पाहिजे.

Loading content, please wait...