
युगांक गोयल, कृती भार्गव
भारताचा न्याय अहवाल (इंडिया जस्टिस रिपोर्ट) हा एक नियमित प्रसिद्ध होणारा अहवाल आहे. तो न्यायव्यवस्थेच्या चार स्तंभांची क्षमता आणि कार्यक्षमतेचे मूल्यांकन करतो. हा अहवाल दरवर्षी ‘टाटा ट्रस्ट’ आणि अन्य नागरी संस्थांद्वारे प्रकाशित केला जातो. त्यात पोलिस, तुरूंग, न्यायव्यवस्था आणि कायदेशीर मदतीचे मूल्यांकन असते. यंदा म्हणजे २०२५ चा चौथा अहवाल प्रकाशित झाला आहे. आपली न्यायव्यवस्था किती सक्षम आहे, याचे मूल्यमापन करणारे एक साधन म्हणून त्याकडे पाहता येईल.