
डॉ. मनीष दाभाडे
रिओ दी जानेरो येथे नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय सुधारणांवर भर देण्यात आला. पुढील वर्षी या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यामुळे, जगातील ५० टक्के लोकसंख्या असणाऱ्या या संघटनेचे नेतृत्व करताना त्याची छाप जगावर सोडण्याची संधी भारताला मिळणार आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर उदयोन्मुख देशांसमोरील प्रश्न व त्यांच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठीही या व्यासपीठाचा भारताला उपयोग होणार आहे.
ब्राझीलच्या रिओ दी जानेरो येथे नुकतीच भारतासह जगातील उदयोन्मुख सत्तांचा सहभाग असणारी ‘ब्रिक्स’ परिषद झाली. ही परिषद केवळ ब्राझीलमधील झगमगाट नव्हता, तर जगातील शासनाला नवा आकार देण्याविषयीच्या मागणीला या परिषदेतून एक व्यासपीठ मिळाले.