
डॉ. मनीष दाभाडे
मालदीवमध्ये २०२३मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी महंमद मोईझ्झू यांनी ‘इंडिया आउट’ची घोषणा केली होती. त्या निवडणुकीत विजयी होऊन मोईझ्झू अध्यक्षपदावर आल्यानंतर भारताच्या विभागीय मुत्सद्देगिरीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
अध्यक्षपदावर आल्यानंतर लगेचच मालदीवमधील भारतीय लष्करी तुकडी मागे घेण्याची मागणी मोईझ्झू यांनी केली होती. त्यानंतरचे त्यांचे धोरण चीनकडे झुकल्याचे स्पष्ट दिसत होते. भारत-मालदीव यांच्या संबंधांतील हा नीचांकी बिंदू होता.