
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
जम्मू आणि काश्मीरमध्ये २०१९ च्या पुनर्रचनेनंतरही भारतीय लष्कराची दहशतवाद्यांसोबत झुंज सुरूच आहे. या भागात दहशतवादाचा प्रश्न जसा दोन दशकांपूर्वी गंभीर होता तसाच तो आजही आहे. भारताने यापासून बोध घेत कही सुधारणा केल्याही पण दहशतवादी हल्ले थांबत नाहीत. पठाणकोट, उरीनंतर सर्जिकल स्ट्राईक, बालाकोटवर प्रीएमटिव्ह (pre-emtive ) हल्ला केला. पहेलगामनंतर ‘ऑपरेशन सिंदूर’. जम्मू आणि काश्मीरची पुनर्रचना केली गेली पण आजही काश्मीरमधे हल्ले चालूच आहेत. ९/११ नंतर अमेरिका दहशतवादी हल्ले रोखण्यात यशस्वी ठरला मग आपण का नाही? हा महत्वाचा प्रश्न आहे.