
Environmental Audit Rules
esakal
संतोष शिंत्रे
पर्यावरण मंत्रालयाने २९ ऑगस्ट २०२५ रोजी ‘एन्वायरनमेंट ऑडिट रुल्स,२०२५’ ही नवी नियमावली लागू केली आहे. पर्यावरण रक्षणासाठी आजवर कार्यरत असलेल्या नियामक यंत्रणा खिळखिळ्या करण्याचा हा डाव वाटतो.
प र्यावरण मंत्रालयाने २९ ऑगस्ट २०२५ रोजी ‘एनवायरनमेंट ऑडिट रुल्स,२०२५’ असे नाव असणारी एक नवी नियमावली लागू केली. उद्योगांवर प्रगाढ विश्वास दाखवणारे(!) सुशासन राबवणे आणि भारतात व्यवसाय-सुलभता आणणे अशा महान उद्दिष्टांनीच हे नियम लागू झाले असल्याने पर्यावरणरक्षणाचा प्रश्नच मिटल्यात जमा आहे. ही सोय वरकरणी कितीही निःस्पृह, उद्योगांना विविध पर्यावरणीय नियम पाळायला लावणारी वाटली, तरी केंद्र सरकारचा निसर्ग-पर्यावरण राखण्याचा गेल्या दहा-अकरा वर्षांचा निराशाजनक इतिहास पाहिला असता, नियमावलीतील ‘फाइन प्रिंट’ मजकुराची छाननी आवश्यक ठरते.