
डॉ. दिलीप सातभाई
dvsatbhaiandco@gmail.com
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी लोकसभेत नवे प्राप्तिकर विधेयक २०२५ सादर केले. नवे प्राप्तिकर विधेयक हे जुन्या प्राप्तिकर कायदा १९६१ची जागा घेईल. सध्याचा प्राप्तिकर कायदा १९६१ हा एक एप्रिल १९६२ पासून अस्तित्वात आला होता. करआकारणी धोरणातील बदलांच्या विकसित गरजांच्या आधारे, वित्त कायद्यांद्वारे आतापर्यंत सुमारे ६५ वेळा एकूण ४००० हून अधिक सुधारणांसह दुरुस्त्या केल्या गेल्या आहेत. कोणताही नवा मूलभूत बदल यात समाविष्ट केला नसून, कायद्याचे सरलीकरण करणे हेच या विधेयकाचे मुख्य उद्दिष्ट आहे.