
कल्याणी शंकर
भविष्याचा वेध घेणाऱ्या ‘स्फटिक गोला’त (क्रिस्टल बॉल) आगामी वर्ष २०२५ बद्दल काय दिसत आहे? बऱ्या-वाईट अशा संमिश्र भविष्यांची ही पोतडी असेल. जगविख्यात फ्रेंच द्रष्टा-ज्योतिषी नॉस्ट्रॅडॅमसने जागतिक घडामोडी आणि भारताच्या २०२५ मधील भविष्याबाबत महत्त्वाची भविष्यवाणी वर्तवलेली आहे.
या नव्या वर्षात प्रयागराजमध्ये हा भव्य धार्मिक सोहळा होत आहे. आगामी वर्षात भारताची वेगवान आर्थिक प्रगती होण्याची चिन्हे आहेत. नवनवीन तंत्रज्ञानही अंगीकारले जाईल. तसेच विविध सामाजिक आव्हानांनाही देशाला सामोरे जावे लागेल.
नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी
सोळाव्या शतकातील या द्रष्ट्या भविष्यवेत्त्याने जगाला दिशा देणाऱ्या घटनांचे भविष्य वर्तविले आहे. त्यात २०१९ च्या करोना महासाथीपासून ते चंद्रावर माणसाच्या पहिल्या पावलापर्यंत अशी नॉस्ट्रॅडॅमसने वर्तवलेली अनेक भविष्ये खरी ठरल्याने जग विस्मयचकित झाले. त्यामुळे त्याच्या भविष्यवाणीला विश्वासार्हता प्राप्त झाली आहे.