
सुधीर फाकटकर
एकविसाव्या शतकातून पुढे जाताना जगभरात अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या देशात अपारंपरिक ऊर्जेचे तंत्रज्ञान विकसित होत असून, या तंत्रज्ञानाच्या आधारे ब्रिटन, चीन, नॉर्वे, झांबिया या देशांमध्येही भारताचा ठसा उमटत आहे. म्हणूनच अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या संशोधन-विकासासाठी मौलिक योगदान देणारे पर्यायी जल ऊर्जा केंद्र महत्त्वाचे विज्ञानतीर्थ आहे.
एकविसावे शतक सुरू होताना जगभरात पारंपरिक ऊर्जास्रोत संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागल्याची दखल घेत प्रगत देशांनी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा (सौर, पवन, जल, भूऔष्णिक, समुद्री लाटा) विकास करण्यासाठी शास्त्रीय संशोधन करण्यावर लक्ष केंद्रित केले.