
डॉ. श्रीकांत परांजपे
saptrang@esakal.com
अमेरिकन अहवालाच्या पलीकडे जाऊन भारतासमोरील खऱ्या आव्हानांबाबत विचार केल्यास एक गोष्ट निश्चितपणे जाणवते, ती म्हणजे आज भारत ज्या झपाट्याने जागतिक पटावर स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे त्याला रोखण्यासाठी जुन्या बड्या सत्ता निश्चितपणे प्रयत्न करताना दिसून येतात. त्यामुळे भारताला आपल्या सामरिक आव्हानांचा पाक व चीनच्या पलीकडे जाऊन विचार करणे क्रमप्राप्त आहे.
पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी त्यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेण्यासाठी एक प्रदीर्घ लेख लिहिला होता. त्या लेखात त्यांनी पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून त्याच्या परराष्ट्र धोरणामध्ये का आणि कसे बदल झाले, याबद्दल सविस्तर मांडणी केली होती.