
India Afghanistan Relations
esakal
भारत- अफगाणिस्तान संबंधांचा विचार करताना धार्मिक भावना, विचारप्रणाली, ‘काबुलीवाला’चे कल्पनाविश्व, बामियानचे भग्न केले गेलेले शिल्प, आदींवर भर न देता सामरिक पातळीवरील व्यापक भूराजकीय व्यवस्थेकडे वास्तववादी दृष्टिकोनातून उचललेली पावले म्हणून बघण्याची गरज आहे.
अफगाणिस्तान म्हटलं की कोणाला ‘काबुलीवाला’ची गोष्ट आठवेल; काहींना सोविएत रशिया आणि त्यानंतरचा अमेरिकेचा हस्तक्षेप स्मरेल, तर कोणाला ओसामा बिन लादेन आठवेल; अशांच्या मनात तालिबान राजवटीच्या काळातील ‘बामियान’च्या मूर्ती उद्ध्वस्त केल्याच्या स्मृती जाग्या होतील. परंतु एक नक्की की, अफगाणिस्तानवर टीका करताना त्याची तुलना इतर इस्लामिक राष्ट्रांशी कोणी फारशी करीत नाही. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्तकी भारत भेटीसाठी येणे आणि दोन्ही राष्ट्रांमध्ये संवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे हे कदाचित धाडसाचे पाऊल मानले जाईल; परंतु तो संवाद साधण्यात या दोन्ही राष्ट्रांनी प्रखर वास्तववादी दृष्टिकोन दाखवलेला आहे.