
माधव शिंदे
व्यापार कराराबाबत अमेरिका सध्या सर्वच देशांशी संघर्षाच्या पवित्र्यात आहे. आपल्या अटी न ऐकणाऱ्या देशांवर जादा शुल्क लावण्याचा अमेरिकेचा इरादा आहे. अमेरिकेला त्यांच्या कृषी उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ खुली हवी आहे, मात्र तसा निर्णय घेतला तर इथल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल. त्यामुळे वाटाघाटीत ठाम राहावे लागेल.
अमेरिकेने अवलंबलेले परस्पर प्रशुल्कवाढीचे धोरण आणि त्याअनुषंगाने सुरु असलेल्या व्यापार वाटाघाटी भारतासह जगातील अनेक देशांच्या अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणा-या ठरत आहेत. अमेरिकेने चीन, कॅनडा, मेक्सिकोसह भारतालाही अमेरिकी वस्तूंवरील आयातशुल्क कमी करण्याचे बजावले होते.