Premium|India US Strategic Relations : भारत-अमेरिका संबंधांमध्ये सहकार्य आणि तणाव दोन्ही कायम; राष्ट्रीय हिताला प्राधान्य की धोरणात्मक भागीदारी?

India US Strategic Relations and Geopolitics : भारत-अमेरिका संबंधांचा शीतयुद्धापासून धोरणात्मक भागीदारीपर्यंतचा प्रवास, संरक्षण सहकार्य, व्यापारातील मतभेद आणि बदलत्या जागतिक भूराजकारणात राष्ट्रीय हिताचे महत्त्व अधोरेखित करतो.
India US Strategic Relations and Geopolitics

India US Strategic Relations and Geopolitics

esakal

Updated on: 

पूनम शर्मा - editor@globalstratview.com

अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांचा प्रवास हा बदलत्या जागतिक भूराजकारणाचा आरसा आहे. १९७१ मध्ये तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यापासून ते आज

सामरिक भागीदारीसाठी अमेरिकेला भारताचे वाटणारे वाढते महत्त्व, असा या संबंधांचा प्रवास राहिला आहे. जगातील दोन महत्त्वाच्या लोकशाही देशांमधील संबंधांमध्ये काळानुसार मोठे बदल झाले; मात्र, तणावाचे मुद्देही कायम राहिले. अशा परिस्थितीत, बदलत्या भूराजकीय समीकरणांत भारत-अमेरिका संबंधांना दिशा देणारे सूत्र कोणते... राष्ट्रीय हित की धोरणात्मक सहकार्य?

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली. त्या वेळी अमेरिकेने आपली विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस एंटरप्राइज’ बंगालच्या उपसागरात पाठवली होती. बांगलादेशीयांवर पाकिस्तानने केलेल्या अत्याचारांचा जगभरातून धिक्कार होत असतानाही, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर पाकिस्तानला पाठिंबा देण्यावर ठाम होते. त्यानंतर पाच दशकांचा काळ लोटला आहे. आज भारत आणि अमेरिका यांच्या युद्धनौका हिंदी महासागरात नियमितपणे संयुक्त लष्करी कवायती करतात. दोन्ही देश एकमेकांना महत्त्वाची लष्करी माहितीही पुरवतात.

आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्य वाढले आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रातील लष्करी सामर्थ्याचा समतोल कायम राखण्यासाठीही दोन्ही देश एकत्रितपणे प्रयत्न करीत आहेत. भारत-अमेरिका संबंधांनी घेतलेले हे वळण निश्चितच नाट्यमय आहे. मात्र, शीतयुद्धाच्या काळापासून ते आजच्या धोरणात्मक भागीदारीपर्यंतचा दोन्ही देशांचा प्रवास सरळ आणि सुरळीत झालेला नाही... आता अमेरिकेने माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना परदेशातील कुशल कर्मचारी आपल्याकडे आणण्यावर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेच्या कामगार मंत्र्यांनी या कारवाईचे वर्णन ‘सापाचे डोके उडवणे’ असे केले. या कंपन्या परदेशातून कुशल कर्मचारी आणून अमेरिकी तरुणांच्या रोजगारांवर गदा आणतात, असे त्यांचे म्हणणे होते. अर्थात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या वक्तव्याचा तात्काळ तीव्र निषेध केला. विशेष म्हणजे, याच वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या चर्चेत तत्त्वतः सहमती झाली होती. मात्र, त्यानंतर ही चर्चा ठप्प झाली. भारत-अमेरिका संबंधांतील सध्याची विसंगती यातून ठळकपणे समोर येते.

Loading content, please wait...