
सुरेंद्र पाटसकर
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारामध्ये अडथळा ठरणारा एक मुद्दा आहे मांसाहारी दुधाचा (नॉनव्हेज मिल्क). मांसाहारी दुधाच्या मुद्द्यावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न ...
आपल्यापैकी बहुतेकांनी बालपणी नाक-तोंड वाकडं करून का होईना, पण दूध नक्कीच प्यायलं असेल. केवळ हाडं मजबूत करण्यापुरतंच नव्हे, तर दूध हे शरीरासाठी अनेक प्रकारे हितकारक आहे. भारतात दुधाला केवळ पोषणमूल्यांच्या दृष्टीनेच नव्हे, तर धार्मिक दृष्टिकोनातूनही मोठे महत्त्व आहे. येथे दुधाचा उपयोग पूजाअर्चा तसेच इतर धार्मिक विधींच्यावेळीही केला जातो.