मुंबई: भारतात मोठ्या प्रमाणात स्टार्टअप निर्माण होत आहेत, अनेक छोट्या शहरांमध्येही स्टार्टअपचे वारे घुमत आहे अशा बातम्या रोज कानी पडत असल्या तरी भारतात होणारे स्टार्टअप हे चीनमध्ये होणाऱ्या स्टार्टअपपेक्षा कसे वेगळे आहे हे चक्क भारताच्या वाणिज्य मंत्र्यांनीच दाखवून दिले आहे.
दिल्ल्ली येथे नुकताच स्टार्टअपविषयीचा महाकुंभमेळा घेण्यात आला. या मेळाव्यात पियुष गोयल बोलत होते. यावेळी भारतातील स्टार्टअप हे चीन पेक्षा कसे वेगळे आहे हे सांगत भारतीय स्टार्टअपवर टीका देखील केली. त्यांनी यावेळी नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर भाष्य केले? चीन आणि भारतातील स्टार्टअपमध्ये नेमका काय फरक आहे? भारतात पुढील काळात कोणत्या क्षेत्रात स्टार्टअप निर्माण होणे आवश्यक आहे? पियुष गोयल यांच्या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेत काय म्हंटले? भारतातील स्टार्टअपच्या नोंदणी प्रक्रियेबाबत कोणी नाराजी व्यक्त केली यावर पियुष गोयल यांनी स्टार्टअपसाठी कोणती हेल्पलाईन सुरु केली? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या माध्यमातून..