
भविष्यात AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्पर्धा अधिक तीव्र होत जाणार आहे. अमेरिकेच्या ChatGpt ला टक्कर देण्यासाठी चीनने मागील आठवड्यात त्यांचं स्वतःचं Deepseek मॉडेल आणले. त्यामुळे अमेरिकेन कंपनीचे शेअर्स कोसळले. चीनचे हे मॉडेल अधिक स्वस्त असल्याने आणि अचूक असल्याचा दावा केला जात असल्याने ChatGpt समोरी आव्हान वाढल आहे. या शर्यतीत भारतही उतरण्याच्या तयारीत आहे आणि येत्या ६-७ महिन्यांत भारताचं स्वतःचं कृत्रिम बुद्धिमत्ता असलेलं मॉडेल जगासमोर येणार आहे. खरं तर भारताने मागच्या वर्षीच IndiaAI या मोहिमेला मान्यता दिली आणि त्यासाठी १० हजार कोटींहून अधिक निधीही मंजूर केला गेला आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे.