

Kargil War
sakal
मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.)-mohinigarge2007@gmail.com
भारतीय हवाई दल दिन आपण नुकताच (८ ऑक्टोबर) साजरा केला. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या हवाई दलाचा इतिहास अत्यंत रोमांचकारी आहे. यातलाच एक तेजस्वी अध्याय म्हणजे कारगिल युद्धातलं ‘ऑपरेशन सफेद सागर’! इतक्या कठीण युद्धभूमीवर अत्यंत प्रभावीपणे हवाईशक्तीचा केला गेलेला प्रतिभाशाली वापर हे कारगिल युद्धाच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक.