
मेजर मोहिनी गर्गे - कुलकर्णी (नि.)
mohinigarge2007@gmail.com
विश्वातली सगळ्यात उंच युद्धभूमी - सियाचीन. २९ मे १९८७ हा दिवस. सेकंड लेफ्टनंट राजीव पांडे... दोनच वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात कमिशन झालेला हा तरुण अधिकारी मोजक्या सहकाऱ्यांसह बर्फाची तटबंदी चढू लागला. शत्रू वर असल्याने खालची कोणतीही हालचाल त्याच्या नजरेतून सुटणार नव्हती. परिस्थिती अत्यंत कठीण होती. ऑक्सिजन अत्यंत कमी होता. मध्येच श्वास थांबत होता. थोडं अंतर चालून गेलं की, थांबून छाती भरून घ्यावी लागत होती. उणे ४० अंशांपर्यंत उतरणारं तापमान!