
SAMBHAV Indian Army
esakal
ऋषिराज तायडे
rushirajtayde@gmail.com
‘ऑपरेशन सिंदूर’ असो किंवा भारत-चीन सीमाप्रश्नी द्वीपक्षीय चर्चा, भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी धोरणात्मक संवादासाठी ‘संभव’ या खास भारतीय बनावटीच्या संवाद प्रणालीचा वापर केला. या पार्श्वभूमीवर केवळ लष्करी सामर्थ्याच्याच नव्हे, तर तांत्रिक बाजूनेही भारतीय सैन्यदल अधिक सक्षम झाले आहे. लवकरच या प्रणालीची अद्ययावत आवृत्ती विकसित होत असून, ती अधिक सुरक्षित असल्याचा दावा सैन्यदलाने केला आहे.
भारतीय सैन्यदलाच्या महत्त्वाच्या बैठका असो किंवा लष्करी कारवायांचे धोरणात्मक डावपेच, संरक्षण विभागातील कोणतीही संवाद प्रक्रियेत प्रचंड गोपनीयता पाळावी लागते. त्यातील कोणतीही गोष्ट वा चर्चा बाहेर पडल्यास, प्रसंगी कायदेशीर कारवाई केली जाते.