

Indian Cinema History
esakal
मूक चित्रपट, बोलके चित्रपट, संगीतमय चित्रपट, भव्य, खर्चिक, साधे-कमी बजेटचे, समांतर, हटके काहीही असोत, कोणतेही असोत, चित्रपटाचा आश्रयदाता असतो प्रेक्षक. रसिक साधा माणूस. भारतीय सिनेरसिक हा खास माणूस आहे. या पुढेही तोच राहील. चित्रपटाचा इतिहास सामान्य माणूस घडवतो, हे त्रिवार सत्य. ‘मुगल-ए आझम’ने त्याचे डोळे दीपतील; पण त्याच्या हृदयात रुंजी घालतील ‘सारंगा तेरी याद में नैन हुए बैचैन’चे मुकेशचे स्वर. तुमच्या आमच्या सारखे...
चित्रपट बोलू लागला, त्याही घटनेला तीन दशकं होत आली आणि पाहता पाहता भारतीय रसिकांचे भावजीवन चित्रपट, कथा, गाणी, कलाकार, त्यांचे आयुष्य, त्यांच्या प्रतिमा, सिनेमाच्या खऱ्या खोट्या सुरस कथा यांनी व्यापून गेलं. हिंदीच्या प्रवाहाला कुणी रोखलं नाही तरीही मराठी चित्रपटाच्या गोदा-कृष्णा वाहत राहिल्या.