

मधुबन पिंगळे
येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या निमिशा प्रिया प्रकरणामुळे परदेशातील भारतीय कैद्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. या कैद्यांच्या सुटकेसाठी राजनैतिक स्तरावर प्रयत्न करण्यात येतात. मात्र, अपुरी मदत व अन्य कारणांमुळे छोट्या गुन्ह्यांमध्येही या कैद्यांना दीर्घ काळ तुरुंगात राहावे लागते.
निमिशा प्रिया या केरळच्या नर्सला येमेनमध्ये फाशीची शिक्षा दिल्यानंतर, तिच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, हा प्रदेश हौथी बंडखोरांच्या ताब्यात असल्याने, त्यांच्याशी राजनैतिक संबंध नसल्याचा परिणाम या प्रयत्नांवर होत आहे.