

Diethylene Glycol in cough syrup
esakal
डॉ. प्रदीप आवटे
खोकल्याच्या औषधांमुळे २३ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर भेसळ औषधे आणि त्याच्या दुष्परिणाम यांवर चर्चा होत आहे. नफेखोरीतूनच आलेल्या बेदरकारपणामुळे औषधांच्या भेसळीचे प्रकार घडतात. ते रोखण्यासाठी कोणाकडूनच गांभीर्याने पावले उचलण्यात येत नाहीत, हे दुर्दैव आहे.
मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्हा, पराशिया तालुका. ३१ ऑगस्ट २०२५ची सकाळ. तीन वर्षांचा छोटा उसेद ताप-खोकल्याने आजारी आहे, म्हणून त्याचे आई-वडील त्याला डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टर त्याला खोकल्याचे औषध देतात, पण औषधानंतर उसेदची प्रकृती अजूनच बिघडते. त्याच्या डोळ्यावर सूज येते, पोटात दुखू लागते, उलट्या होऊ लागतात.