Premium|Indian Economy Growth : अर्थव्यवस्थेची वाढ कौतुकास्पदच...

India’s Economic Growth Amid Global Uncertainty : भारतीय अर्थव्यवस्थेने २०२६च्या आव्हानात्मक वातावरणात ७.८ टक्के वाढ नोंदवली. डॉलर ठेवी, परकी चलनसाठा आणि वाढते करदाते यामुळे अर्थव्यवस्थेला भविष्यातील धक्के सहन करण्याचे बळ मिळाले.
Indian Economy Growth

Indian Economy Growth

esakal

Updated on

भरत फाटक - saptrang@esakal.com

सजगतेचा उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेने अनिवासी भारतीयांसाठी डॉलर डिपॉझिटची योजना जाहीर केली. त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की मुदतीपूर्वी एक महिना योजना बंद करता आली. १२७ अब्ज डॉलर्सच्या ठेवींनी सर्व अंदाज मागे टाकले. परकी चलनाची गंगाजळी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर ७४४ अब्ज डॉलरला पोचली आहे. यातून व्यवस्थेला स्थैर्य आणले आहे आणि भविष्यातील धक्का सहन करण्याचे सामर्थ्य वाढविले आहे. त्याचबरोबर गेल्या बारा वर्षांत करदाते ७ कोटींनी वाढले आहेत. चर्चेत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधीचे टिपण...

भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये एप्रिल-जून २०२६ च्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ झाली. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिले जाते. जागतिक स्थिती गेली दोन वर्षे अतिशय दोलायमान आहे. जग संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. व्यापारी धोरणांमध्ये मोठे बदल करून जगातील इतर देशांवर आयात शुल्क (टेरिफ) लादून अमेरिकेने वातावरण ढवळून टाकले. रशिया-युक्रेन, हमास-इस्त्रायल, ऑपरेशन सिंदूर यासारखे धक्के सहन करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला इराण-अमेरिकेच्या समरप्रसंगातून २०२६मध्ये पुढे जावे लागत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी रोखली गेल्यामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किंमती भडकल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत ऊर्जा आणि इतरही मालाच्या किमती कडाडल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com