INDIAN FOOTBALL COLLAPSING: CAN OCI RESCUE THE TEAM?
हाँगकाँग येथे नव्याने बांधलेल्या, कोऱ्या करकरीत, भव्य स्टेडियमवर भारतीय फुटबॉल संघाला मागील आठवड्यात खेळण्याची संधी मिळाली. पन्नास हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियमवर ४९,९०० चाहते हे यजमान हाँगकाँगच्या बाजूने होते भारताला सपोर्ट करणारे शंभरऐक फुटबॉल प्रेमी असतील, त्यांचे डोळे टीम इंडियाच्या विजयाचा क्षण टिपण्यासाठी आतुरले होते, मनात एक आशा होती की, आज तरी आपला संघ जिंकेल. पण, पदरी पुन्हा निराशा आली. भारतीय संघाला AFC Asian Cup qualification स्पर्धेत हाँगकाँगकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला. हा नुसता पराभव नव्हता, तर भारतीय फुटबॉल शेवटची घटका मोजू लागला आहे आणि आता तरी जागे व्हा, हे सांगणारा संकेत होता.