
संकल्प गुर्जर
गेली सुमारे साडेसात दशके भारताने कठीण परिस्थितीचा सामना करतच वाटचाल केलेली आहे. या वाटचालीमध्ये परराष्ट्र धोरणाने महत्वाची भूमिका बजावलेली आहे. सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणासमोर नवी आव्हानेही उभी राहत आहेत.
को णत्याही देशाचे परराष्ट्र धोरण हे त्या देशाचा भूगोल, राजकारण, अर्थकारण, शेजारी देश आणि विकासाची आव्हाने याला समोर ठेवून आखले जाते. भारतही याला अपवाद नाही. जगभरात होणाऱ्या वेगवेगळ्या घटना-घडामोडींच्या निमित्ताने परराष्ट्र धोरणासमोर आव्हाने उभी राहत असतात आणि त्याला तोंड द्यावे लागते.