changing music Industry
Esakal
पुणे - एकेकाळी एखाद्या गायकाला किंवा संगीतकाराला मोठ्या म्युझिक लेबलची साथ मिळाल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर पोहोचणं जवळपास अशक्य होतं. तर भारतीय संगीत म्हणजे प्रामुख्याने हिंदी चित्रपट संगीत, अशीच समज होती पण प्रादेशिक भाषांमधील संगीत हा भारतीय बाजारातील सर्वात वेगाने वाढणारा विभाग आहे. तसेच संगीतकार गायक आता कोणत्याही मोठ्या कंपनीच्या मदतीशिवाय आपल्या गाण्याच्या जोरावर मोठे होऊ लागले आहे.
भारतीय बाजार जगातील Top 15 music markets पैकी एक आहे. त्यामुळेच यामध्ये काळानुसार बदल कसा झाला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आज ‘कनमनी’ हे तमिळ गाणं सगळ्याच भाषेचे लोक का ऐकतात, तर गुलाबी साडी या गाण्यावर अमेरिकेतील तरूणाई देखील का नाचते.., भारतातील संगीत कसं बदलतं आहे, त्यासोबतच त्याची नवी बाजारपेठ कशी बदलते आहे, यामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा सहभाग कसा आहे आणि आता चार ते पाच कडव्याच्या गाण्यऐवजी लोकांना ३० सेकंदाची गाण्यातल्या त्या एका भागाची भुरळ का पडली आहे या सगळ्याविषयी या सकाळ+ च्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. Global Music Report, , YouTube Culture & Trends Reports अशा रिपोर्टसच्या माध्यमातून हा भारतीय संगीताच्या आवडीचा तसाच बाजरपेठेचा प्रवास कसा बदलतोय हे समजून घेऊया..