
नीरजा चौधरी
देशभरातील १५ राज्यांतील ४८ पोटनिवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच थेट लढत होती. अपवाद लोकसभेच्या दोन जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकांचाच. महाराष्ट्रातील नांदेडची जागा ही तेथील खासदारांच्या निधनामुळे, तर वायनाडची जागा राहुल गांधी यांनी सोडून दिल्यामुळे येथे लोकसभेसाठी पोटनिवडणूक होत होती. या दोन ठिकाणचा अपवाद वगळता काँग्रेस या लढाईमध्ये फारशी नव्हतीच. आक्रमक अशी तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हे इंडिया फ्रंटमधील महत्त्वाचे भागीदार त्यांच्या अस्तित्वासाठी लढत होते.