
सुनील चावके
देशाच्या सामाजिक आणि आर्थिक वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय रेल्वेच्या प्रगतीविषयी दशकभरापासून सदैव गुलाबी चित्र रंगविले जात आहे. पण १५ ते ९० सेकंदांच्या उदंड गाजावाजा करणाऱ्या ‘रिल्स’ म्हणजे वेगवान, सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर प्रवासाचे संपूर्ण वास्तव नव्हे.