Premium|Indian Stock Market Analysis : जागतिक संकटांचा दबाव असूनही भारतीय शेअर बाजार टिकून; गुंतवणुकीच्या संधींचा नव्याने आढावा

Indian Stock Market and Value Investing : जागतिक युद्ध, कच्च्या तेलाचे वाढते दर, रुपयातील घसरण आणि व्यापारातील अनिश्चितता अशा आव्हानांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था व शेअर बाजाराची स्थिती, तसेच निवडक कंपन्यांच्या गुंतवणूकक्षमतेचा आढावा.
Indian Stock Market and Value Investing

Indian Stock Market and Value Investing

esakal

Updated on: 

भूषण ओक - bhushanoke@hotmail.com

आर्थिक विषयांना वाहिलेल्या ‘सकाळ मनी’ या महाराष्ट्रातील या क्षेत्रात सर्वांत यशस्वी मासिकातून आपण या लेखमालेतून ऑक्टोबर २०२४ पासून आतापर्यंत एकोणीस कंपन्या आणि बँकिंग, ग्रीन हायड्रोजन, सौर ऊर्जा आणि ड्रोन तंत्रज्ञान अशा काही क्षेत्रांचा गुंतवणुकीच्या दृष्टीने सविस्तर अभ्यास केला. गुंतवणूक क्षेत्रांच्या अभ्यासात आपण मुख्यतः तंत्रज्ञान आणि क्षेत्राच्या मूल्यसाखळीतील आघाडीच्या आणि महत्वाच्या कंपन्यांचा विचार केला. या सर्व कंपन्यांची निवड मूल्याधिष्ठित गुंतवणुकीच्या तत्त्वाच्या निकषांना ध्यानात ठेवून केली होती. दोन वर्षांच्या कालावधीत अभ्यासलेल्या कंपन्यांची कामगिरी, शेअर बाजाराची एकूण स्थिती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्या गृहीतकांवर आणि तर्कसंगत आधारांवर आपण हे व्यवसाय अभ्यासले त्यात काही गुणात्मक फरक पडला आहे की नाही, या सर्व गोष्टींचा आढावा घेणारा हा लेख...

अमेरिका इराण-इस्राईल युद्ध सध्यातरी थंडावले असले, तरी होर्मुझचे आखात बंदच आहे. त्यात भर म्हणून सौदी अरेबियातून लाल समुद्रावाटे होणारी तेल वाहतूकसुद्धा काही प्रमाणात हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे बाधित झाली आहे. खनिज तेलाचे दर ९०-११० डॉलर प्रतिबॅरल असे वाढलेलेच आहेत. रुपया बराच पडला आहे. या सर्वांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर निश्चितच वाईट परिणाम होत आहे. त्यातच यावर्षी पाऊससुद्धा जवळजवळ १३ टक्क्यांनी कमी पडला आणि त्या निकषानुसार हे ‘दुष्काळी वर्ष’ घोषित झाले आहे. भारत-अमेरिका व्यापार करार अडकलेला आहे आणि अतिरिक्त करांची टांगती तलवार भारतीय उद्योगांवर लटकत आहे. भारताच्या निर्यातीत मोठा वाटा असणारा आयटी उद्योग ‘एआय’च्या भीतीने थंडावला आहे. अर्थव्यवस्थेवर आणि बाजारावर दुष्प्रभाव करणारे इतके घटक कार्यान्वीत असूनही एकूण देशांतर्गत उत्पादन अर्थात ‘जीडीपी’वाढ चांगली आहे आणि शेअर बाजारही फार कोसळला नाही. हे अर्थव्यवस्थेच्या अंगभूत आणि मूलभूत शक्तीचे द्योतक आहे. इराण युद्ध आणखी रेंगाळण्याची शक्यता बरीच आहे आणि खनिज तेलाचे दर वाढीवच राहिले, तर अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः महागाई दरावर परिणाम नक्की दिसेल. उलटपक्षी इराण युद्ध थांबले आणि होर्मुझचे आखात खुले झाले, तर खनिज तेलाचे दर लगेच कमी होतील आणि अशा स्थितीत शेअर बाजारात मोठी उसळी अनुभवास येईल.

Loading content, please wait...