
Indian defence self reliance
esakal
दुसऱ्या महायुद्धापासून भारत हा शस्त्रास्त्रांची आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता. मात्र शस्त्रास्त्रांमध्ये आत्मनिर्भर होण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन काही वर्षांमध्ये प्रयत्न करण्यता आले. त्यामुळे, संरक्षण क्षेत्रातील अनेक प्रणालींमध्ये भारत स्वावलंबी झाला असून, शस्त्रास्त्रांची निर्यातही करू लागला आहे.
संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाचे महत्त्व सांगताना कलाम यांचे वरील विधान खूप महत्त्वाचे ठरते. स्वातंत्र्यापासून पारंपरिकपणे भारत हा शस्त्रास्त्रांची आयात करणारा देश म्हणून ओळखला जातो. मात्र, शस्त्रास्त्रांचा आयात करणारा देश ही ओळख बदलत असून, शस्त्रास्त्रे निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत स्थान मिळत आहे. विशेषतः ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय संरक्षण प्रणालींची क्षमता सिद्ध झाली असून, भारताच्या शस्त्रास्त्रे व संरक्षण प्रणालींविषयी जगभरात उत्सुकता निर्माण झाली आहे.