

Year 2026 Predictions
esakal
पुढील वर्षांत राजकीय क्षेत्रामध्ये विविध बदल होण्याची अपेक्षा असून, हे वर्ष स्थित्यंतराचे असल्याचे म्हटले जाते. सन २०२६ मध्ये भारताच्या ‘जीडीपी’ वाढीचा अंदाज ६.५ टक्के वर्तविण्यात आला आहे. ही वाढ मुख्यतः मजबूत देशांतर्गत मागणी, सरकारी पायाभूत सुविधा खर्च, आणि स्थिर महागाईमुळे होईल. याशिवाय जागतिक पातळीवर अनेक बदल अपेक्षित असून, हवामान बदलही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.
वर्ष २०२५ आता संपायला आले आहे आणि सन २०२६ पुढे उभे ठाकले आहे. कसे असेल २०२६? पुढच्या वर्षामध्ये नक्की काय घडेल, कोणते राजकीय बदल होतील, नवीन वर्षांमध्ये कोणत्या क्षेत्रात स्थित्यंतर होईल याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. विविध राजकीय बदल नवीन वर्षांत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नोस्ट्रॅडॅमस यांचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यांनी वर्तविलेले बहुतांश भविष्य खरे झाले आहे. दोन जागतिक युद्धे, हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ले, अमेरिकेतील ९/११ दहशतवादी हल्ले यांसारख्या अनेक घटना त्यांनी १५५५ मध्ये लिहिल्या होत्या. कालांतराने त्या प्रत्यक्षात आल्या आहेत. त्यांच्या मजकुरातील अस्पष्ट शब्दरचनेचे अनेक अर्थ निघू शकतात. इतिहासकार अनेकदा त्यांनी वर्तविलेल्या भविष्यवाणीच्या विश्वासार्हतेवर चर्चा करतात.