
Manufacturing industry
esakal
भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या एका नव्या वळणावर उभी आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि ही अर्थव्यवस्था उद्योजकता, कौशल्य, आणि आव्हानांना सामोरी जाणारी आहे. ‘आत्मनिर्भरता’ या संकल्पनेने देशातील उद्योगक्षेत्रात मुळे रुजवली आहेत. ती आगामी काळात नक्कीच जास्त सक्षम होतील.
भारताच्या आर्थिक विकासात सेवाक्षेत्राने जरी मोठे योगदान दिले असले तरी प्रगती अन् आत्मनिर्भरतेत उत्पादन क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. तथापि, गेल्या काही वर्षांपासून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) उत्पादन क्षेत्राचा वाटा कमी होत असल्याचे दिसते. देशाच्या एकंदर उत्पादन मूल्यवर्धनाचा एकंदर राष्ट्रीय उत्पादन मूल्यवर्धनात २०२३-२४ मध्ये सुमारे १५.९ टक्के ते १७ टक्के सहभाग होता. जागतिक बँक आणि ‘ग्लोबल इकोनॉमी’च्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत उत्पादन क्षेत्राचा राष्ट्रीय सकल उत्पादनांतील वाटा सुमारे १२.५ टक्के होता.