
SCO summit India
esakal
डॉ. मनीष दाभाडे
चीनच्या तिआनजिन शहरामध्ये नुकत्याच झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेमध्ये (एससीओ) पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. त्यांची या परिषदेची उपस्थिती अन्य कोणत्याही बहुराष्ट्रीय परिषदेच्या तुलनेमध्ये जास्त लक्षवेधी ठरली. जून २०२०मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत-चीन यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले होते.
त्याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर आयात शुल्क लादले असून, भारत, चीन आणि रशिया या देशांवर निर्बंधही आणले आहेत. या दोन्ही आंतरराष्ट्रीय संदर्भांचा विचार करता, मोदी यांची चीनमधील या परिषदेला हजेरी जगाचे लक्ष वेधून घेणारी ठरली.