

US China power struggle
esakal
जागतिक राजकारणात अमेरिका व चीन यांच्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. युरोप, रशिया व इतर राष्ट्रांनाही या संघर्षाच्या झळांना सामोरे जावे लागते. या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनने अमेरिकेला दिलेल्या वागणुकीपासून सावध पवित्रा घेत आपल्या वसुधैव कुटुंबकम, लोकशाही व सर्वसमावेशकपणाच्या मूल्यांची कास धरल्यास भारताच्या सॉफ्टपॉवर राजनयाचा विकास केल्यास एक मोठी शक्ती म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.
आज जागतिक पटलावर दोन प्रमुख महासत्ता असणाऱ्या चीन आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये तणाव असला तरी दोघेही परस्परांच्या सामर्थ्याचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांमधील संबंध तणावपूर्ण आणि संघर्षमय असले तरी चीनच्या एकूणच आर्थिक विकासामध्ये किंवा चीनला जागतिक पटलावर आणण्यामध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात १९९२-९३ सालापासून म्हणजेच बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष असतानाच झाली. तेव्हापासून अगदी बराक ओबामांच्या काळापर्यंत अमेरिकेची ही प्रक्रिया निरंतनपणे सुरू होती.