
प्रा. अशोक मोडक
चीन ‘एक पट्टा व एक रस्ता’ या व्यूहरचनेत कैक विकासोन्मुख देशांना बेड्यांनी जखडून ठेवीत आहे. भारताचे अनेक शेजारी देश त्यात आहेत. भारताचा शेजारी देशांशी दुरावा असेल तर नुकसानच होईल. त्यादृष्टीने नेपाळमधील घडामोडींवरही लक्ष देण्याची गरज आहे.
ने पाळात राजेशाहीचे पुनरुज्जीवन करण्यास काही जण अतिशय उतावीळ झाले आहेत, कारण सन २००८मधे तिथे लोकशाहीचा शुभारंभ झाला, पण काडीचेही स्थैर्य नाही. सरकारे येतात, ती औटघटकेची सत्ता राबवितात व दुसरे सरकार या सरकारला खो देते. त्यामुळे शाळकरी विद्यार्थीही अस्वस्थ आहेत. प्रश्नाला हे उत्तर बरोबरच आहे, पण नेपाळात काय चालले आहे ? या प्रश्नाला आणखी दोन उत्तरे देता येतील.