
Indira Gandhi Bonded Labour Law
esakal
ट्रान्झिस्टरवर इंदिरा गांधींच्या मृत्यूची बातमी कळताच मी आतून पुरता कोसळलो. मी सातवी-आठवीत असताना १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेशची निर्मिती करणाऱ्या इंदिराजी माझ्या पिढीला कमालीच्या प्रभावित करून गेल्या होत्या. नव्या बांगलादेशाच्या निर्मितीमुळे त्या काळाने त्यांना
वेठबिगार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत, जिल्हा प्रशासनाच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या अनास्थेबाबत मी सर्वोच्च न्यायालयाला लिहिलेली पत्रं सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिकेत रूपांतरित करून घेतलेली होती. रिट याचिका दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाला त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली होती; परंतु ते त्यात कुचराई करीत होतं. रिट याचिका दाखल करताना सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कडक शब्दांत जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाची कानउघाडणी केली होती. स्वाभाविकपणे जवळपास दर महिन्याला स्थापन झालेल्या दक्षता समितीची बैठक ठाणे जिल्ह्यात नियमितपणे होऊ लागली होती. साधारणतः वर्षभरापूर्वीच मला आणि विद्युल्लताला दक्षता समितीत निमंत्रित करण्याची सूचना कामगार आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती; परंतु दक्षता समितीच्या सभा क्वचितच होत. त्यामुळे त्याची अंमलबजावणी लांबणीवर जात होती. रिट याचिकेनंतर मात्र दक्षता समितीच्या सभा नियमित होऊ लागल्या होत्या. त्यानंतर जवळपास वर्षभर दर महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांना तारखेला स्वतः हजर राहून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र द्यावं लागे. त्यामुळे त्यांना उत्तरदायित्व दाखविण्याशिवाय दुसरा तरणोपाय नव्हता.