Aslam Inamdar Pro Kabaddi
esakal
Premium| Aslam Inamdar: चहाच्या टपरीपासून ते कबड्डीचा कर्णधार होण्यापर्यंतचा प्रवास!
सुनंदन लेले
sdlele3@gmail.com
भारतात विविध खेळांच्या प्रोफेशनल लीग चालू झाल्या आहेत. प्रत्येक गोष्टीकडे बघून नाक मोडणाऱ्या काही लोकांना हा सगळा फक्त पैशाचा खेळ वाटतो. ज्यांना खेळाची जाण आहे, ते खोलात जाऊन तपासतात आणि मग त्यांना अशा लीगचे महत्त्व समजते. खेळाचा प्रचार-प्रसार या लीगमधून होतो. त्यानंतर खेळ छोट्या गावातून आणि अत्यंत साध्या घरातून आलेल्या खेळाडूंना हीरो कसे बनवते याच्या सत्यकथा बघायला मिळतात.
अशीच एक अजब कथा आहे महाराष्ट्राच्या छोट्याशा गावातून आलेल्या मुलाची, ज्याने परिस्थितीवर केवळ मेहनतीने मात करत मोठ्या संघांचे दरवाजे उघडायला लावले. २०११ मध्ये त्याने खेळणे चालू केले आणि आज तो मुलगा खेळाच्या प्रोफेशन लीगमधील एका नावाजलेल्या संघाचा कप्तान आहे. होय मी कहाणी सांगतोय पुणेरी पलटण कबड्डी संघाच्या कप्तानाची... अस्लम इनामदारची.

