Human right about student protest
Esakal
पुणे - पुर्वी एक म्हण होती, पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर दाद कुणाकडे मागायची..? जिथं योग्य मार्गाने आंदोलन करण्याचे सर्व पर्याय थकतात किंवा जिथं आपलं म्हणणं ऐकूनच घेतलं जाणार नाही हे लक्षात येतं तिथं पर्याय तरी काय? अशा अर्थाची ही म्हण..!
भारतात सुरू असणाऱ्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काहीशी अशीच स्थिती पहायला मिळते आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करू पहाणऱ्या विद्यार्थ्यांना, कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबंलं जातं आहे. यावर सर्वोच्च न्यायायलाकडून काहीतरी होईल अशी आशा असतानाच न्यायालयानेही विरोधात निकाल दिल्याने आता नेमकी दाद तरी कोणाकडे आणि कशी मागायची असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना होणाऱ्या या मारहानीबाबत, पत्रकारांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मिळवणे खरंच शक्य आहे का? अशा प्रकारे एखाद्या देशाच्या अंतर्गत गोष्टीत दुसरे देश हस्तक्षेप करू शकतात का? विद्यार्थ्यांना मानवाधिकार संघटनांकडून मदत मिळू शकते का? याविषयीचे आंतरराष्ट्रीय नियम व कायदे काय आहेत हे सगळंच सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.