

पुरूषोत्तम बेडेकर
अर्थशास्त्राचा पायाभूत विचार म्हणजे, एखाद्या गोष्टीची किंमत ही त्या गोष्टीसाठी असणारी मागणी आणि त्या गोष्टीाचा होणारा पुरवठा यावर अवलंबून असते.
अर्थात, आपण रोजच्या जीवनामध्ये याचा अनुभव घेत असतो. पुरवठा जास्त आणि मागणी कमी असली, तर कित्येकदा दर इतके कमी होतात, की वस्तूचे उत्पादन मूल्यही मिळणे अवघड होते.
नाशवंत शेतमालाच्या बाबत असे वारंवार घडते. अशीच काहीशी अवस्था आपल्याकडे उपलब्ध असलेला पैसा, आशा-आकांक्षा, जीवनशैली आणि त्याचबरोबर दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेला पैसा यांच्या व्यस्त प्रमाणाबाबत असते.